नागपुरात पिस्तुलांचा सर्रास वापर करणाऱ्या आरोपीला अटक !
नागपूर : शहरात गुन्हेगारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यातही नागपुरात पिस्तुलांचा सर्रास वापर होत असल्याच्या घटनाही उघडकीस येत आहे. संशयावरून पकडलेल्या एका आरोपीच्या खिशातूनच चक्क पिस्तूल निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दर आठवड्यात आरोपींकडे पिस्तूल सापडल्याचे गुन्हे दाखल होत असून पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांचे पथक गस्त घालत […] The post नागपुरात पिस्तुलांचा सर्रास वापर करणाऱ्या आरोपीला अटक ! appeared first on Nagpur Today : Nagpur News.
नागपूर : शहरात गुन्हेगारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यातही नागपुरात पिस्तुलांचा सर्रास वापर होत असल्याच्या घटनाही उघडकीस येत आहे. संशयावरून पकडलेल्या एका आरोपीच्या खिशातूनच चक्क पिस्तूल निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दर आठवड्यात आरोपींकडे पिस्तूल सापडल्याचे गुन्हे दाखल होत असून पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे.
माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना मस्कासाथ मार्गावरील बंगालीपंजा येथील मेमन जमात हॉलच्या गल्लीत दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या बसलेले दिसले. पोलीस तेथे पोहोचले असता एक आरोपी पळून गेला तर दुसऱ्या आरोपीला पडकण्यात पोलिसांना यश आले. तपासात पोलिसांना पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आढळली. गणेश विश्वनाथ तलवारे (३०, चांद मोहल्ला, बंगालीपंजा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचा सहकारी फहीम उर्फ गुड्डू शेख (बंगालीपंजा) हा फरार असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
The post नागपुरात पिस्तुलांचा सर्रास वापर करणाऱ्या आरोपीला अटक ! appeared first on Nagpur Today : Nagpur News.
What's Your Reaction?