व्हिडीओ; डॉक्टरांसह रुग्णांसाठी आयसीयू किती महत्त्वाचे?नागपूर टुडेशी संवाद साधताना डॉ. निर्मल जयस्वाल म्हणाले…
नागपूर: श्योरटेक हॉस्पिटलचे आयसीयू डायरेक्टर आणि कंसल्टेंट फिजिशियन डॉ निर्मल जयस्वाल यांनी नागपूर टुडेशी संवाद साधला. यादरम्यान बोलतांना डॉक्टरांसह रुग्णांसाठी आयसीयू किती महत्त्वाचे ? यासंदर्भात त्यांनी भाष्य केले. आयसीयू रूग्णांसाठी आशेचे किरण आहे. हे ठिकाण डॉक्टरांसह रुग्णांसाठी मंदिर असल्यासारखे आहे, असे डॉ निर्मल जयस्वाल म्हणाले. वैद्यकीय क्षेत्रातील माझी 25 वर्षाची कारकर्दीत खूप समाधानी असल्याचेही जयस्वाल […] The post व्हिडीओ; डॉक्टरांसह रुग्णांसाठी आयसीयू किती महत्त्वाचे?नागपूर टुडेशी संवाद साधताना डॉ. निर्मल जयस्वाल म्हणाले… appeared first on Nagpur Today : Nagpur News.
नागपूर: श्योरटेक हॉस्पिटलचे आयसीयू डायरेक्टर आणि कंसल्टेंट फिजिशियन डॉ निर्मल जयस्वाल यांनी नागपूर टुडेशी संवाद साधला. यादरम्यान बोलतांना डॉक्टरांसह रुग्णांसाठी आयसीयू किती महत्त्वाचे ? यासंदर्भात त्यांनी भाष्य केले.
आयसीयू रूग्णांसाठी आशेचे किरण आहे. हे ठिकाण डॉक्टरांसह रुग्णांसाठी मंदिर असल्यासारखे आहे, असे डॉ निर्मल जयस्वाल म्हणाले.
वैद्यकीय क्षेत्रातील माझी 25 वर्षाची कारकर्दीत खूप समाधानी असल्याचेही जयस्वाल म्हणाले.मी माझ्या रुग्णांसाठी 24×7 उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.डॉ. निर्मल जैस्वाल हे 1997 पासून आरोग्य सेवा व्यवस्थेचा एक भाग आहेत.
आपल्या वैद्यकीय कारकिर्दीतला अविस्मरणीय अनुभवही डॉ जयस्वाल यांनी नागपूर टुडेशी शेयर केला. नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा अपघात झाला होता .यादरम्यान तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.तिला श्योरटेक हॉस्पिटलमध्ये ईमरजन्सी दाखल करण्यात आले. माझ्यासाठी तो केस हाताळणे आव्हानात्मक होते. पण आनंदाची गोष्ट म्हणजे मी आणि माझ्या टीमने त्या महिलेला आणि तिच्या बाळाला सुखरुप वाचविले याचा मला आनंद असल्याचे डॉ जयस्वाल म्हणाले.
श्योरटेक हॉस्पिटलचे व्यवस्थापन आपल्या रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी सादैव तत्पर आहे. आमच्या रुग्णालयातून जेव्हा कोणता रुग्ण बरा होऊन जातो. तसेच त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो.तीच आमच्या कामाची खरी पोच पावती असल्याचेही जयस्वाल म्हणाले.
The post व्हिडीओ; डॉक्टरांसह रुग्णांसाठी आयसीयू किती महत्त्वाचे?नागपूर टुडेशी संवाद साधताना डॉ. निर्मल जयस्वाल म्हणाले… appeared first on Nagpur Today : Nagpur News.
What's Your Reaction?