नागपुरात रस्ते अपघाताचा कहर; गेल्या 5 वर्षात 1271 जणांना गमवावा लागला जीव !

नागपूर: शहरात रस्ते अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत चालली आहे. नुकतेच रामझुला ओहरब्रिजवर मर्सडिजने चिरडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. मर्सडिज चालक महिलेच्या बेजबाबदारपणामुळे दोन निष्पापांचा जीव गेल्याने नागपूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागपुरात गेल्या पाच वर्षांत रस्ते अपघातात एकूण 1271 जणांचा बळी गेल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. अपघातातील मृतकांची आकडेवारी – नागपूर पोलिसांनी जारी […] The post नागपुरात रस्ते अपघाताचा कहर; गेल्या 5 वर्षात 1271 जणांना गमवावा लागला जीव ! appeared first on Nagpur Today : Nagpur News.


Feb 29, 2024 - 12:58
 0  23
नागपुरात रस्ते अपघाताचा कहर; गेल्या 5 वर्षात 1271 जणांना गमवावा लागला जीव !

नागपूर: शहरात रस्ते अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत चालली आहे. नुकतेच रामझुला ओहरब्रिजवर मर्सडिजने चिरडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. मर्सडिज चालक महिलेच्या बेजबाबदारपणामुळे दोन निष्पापांचा जीव गेल्याने नागपूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागपुरात गेल्या पाच वर्षांत रस्ते अपघातात एकूण 1271 जणांचा बळी गेल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

अपघातातील मृतकांची आकडेवारी –
नागपूर पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये एकूण 233 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर 2020 मध्ये नोवेल कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे ही संख्या 195 पर्यंत घसरली आहे. तसेच 2021 मध्ये कोविड-19 निर्बंध शिथिल झाल्यानंतर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली. परिणामी विविध अपघातांमध्ये 255 लोकांना आपला जीव गमवावा लागला.2022 आणि 2023 या वर्षांमध्ये मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. या दोन वर्षांमध्ये 294 लोकांनी आपला जीव गमावला.ही आकडेवारी पाहता राज्याच्या दुसऱ्या राजधानीत गेल्या पाच वर्षांत एकूण 1,271 रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे.

‘हे’ आहेत अपघाताचे मुख्य कारण –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक रस्ते अपघात मानवी चुकांमुळे होतात. मात्र सातत्याने पोलिसांच्या दंडात्मक कारवाई ते मुखातात. याच कारणांमुळे वाहनचालकांचे धाडस वाढते आणि सर्रास वाहतुकीचे नियम तोडले जातात.यात फूटपाथऐवजी रस्त्यावरून चालणारे पादचारी,ओव्हरस्पीड, वाहनचालकाचे लक्ष विचलित करणे, सिग्नल तोडणे सीट बेल्ट आणि हेल्मेट यांसारखे सुरक्षा उपकरण टाळणे,चुकीच्या बाजूने वाहन चालवणे,बेजबाबदारपणे वाहन चालवणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, वाहतुकीदरम्यान मोबाईल फोन वापरणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, रस्त्यावरील खड्डे आणि ऑटोरिक्षा व इतर सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणे हे अपघात होण्यामागचे प्रमुख करणे आहेत.

नागपूर शहरातील वाढत्या रस्ते अपघाताचे प्रमाण पाहता पोलीस आयुक्त डॉ. रविंदर सिंगल यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी त्यांच्या 7385982212 या सेल क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

नागपुर पोलिसांचा वाहतूक विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इतर संबंधित प्राधिकरणांशी सूचनाफलक लावणे, झेब्रा क्रॉसिंग रंगविणे आणि सर्व चौकांवर स्टॉप लाईन लावणे यासाठी प्रयत्न करीत आहेत. शहराची विकासकामे लांबणीवर पडत असतानाच आता पोलीस आयुक्तांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्व बाबी स्वत:च्या हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

– शुभम नागदेवे

The post नागपुरात रस्ते अपघाताचा कहर; गेल्या 5 वर्षात 1271 जणांना गमवावा लागला जीव ! appeared first on Nagpur Today : Nagpur News.


What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

mayankrajkumarofficial Mayank Rajkumar Sambare, from Nagpur, Maharashtra is a Young Cyber Security Expert, Entrepreneur, Public Speaker, and a Brilliant Author. He Owns a Cyber Security Company Named CODELANCER CYBER SECURITY AND FORENSICS which is located in Nagpur, Maharashtra also the Founder of the Cyber Volunteer Organisation India.